Gold Loan : गोल्ड लोन हे कमी कागदपत्रांसह एक साधे सुरक्षित कर्ज असल्याचे अनेकदा सांगितले जाते. यामध्ये लवकर आणि कमी कागदोपत्री पैसे मिळतात. मात्र, या सुलभ कर्जासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांवर RBI कडून करडी नजर ठेवली जात आहे. Gold Loan घेणे भारतात खूप लोकप्रिय आहे आणि यामुळे RBI ने सर्व गोल्ड लोन देणाऱ्या संस्था, मग त्या बँका असोत किंवा गोल्ड लोन फायनान्स कंपन्या, यांच्यासाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. सोन्याचे वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कसा परिणाम होणार आहे ते जाणून घ्या.
RBI ने 2 दिवसांपूर्वी घेतलेले निर्णय
रिझर्व्ह बँकेने 2 दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार या क्षेत्रातील सुवर्ण कर्ज देणाऱ्या ज्वेलर्स-संस्थांच्या कार्यपद्धतीत त्रुटी आढळून आल्या असून ते नियमानुसार पूर्णपणे काम करत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे, GOLD LOAN घेणाऱ्या ग्राहकां समोर सोन्याचे मूल्यांकन ठरवले जात नाही. इतर GOLD LOAN घेताना पडताळणी आणि देखरेख असूनही, पूर्णपणे पारदर्शकता ठेवली जात नसून त्यांना बेफिकीर वागणूक दिली जात आहे. याशिवाय ग्राहकाने कर्जाची रक्कम न भरल्यास दागिन्यां चाही लिलाव करून पारदर्शकता न बाळगता विक्री केली जात आहे.
सप्टेंबरमध्ये RBI ने कोणती पावले उचलली?
भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 सप्टेंबर 2024 रोजी IIFL फायनान्स लिमिटेड (इंडिया इन्फोलाइन) च्या सुवर्ण कर्ज व्यवसायावरील बंदी उठवली, त्यानंतर कंपनीने GOLD LOAN ची विक्री सुरू केली.मंजूरी देण्यावरील बंदी उठवण्यात आली असून कंपनी आपला गोल्ड लोन व्यवसाय पुन्हा सुरू करू शकते.
आरबीआयच्या कठोरते नंतर काल सोन्याच्या व्यवसायाशी संबंधित शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मंगळवार, 1 ऑक्टोबर रोजी सोन्याचे व्यवहार करणाऱ्या ज्वेलर्स किंवा गोल्ड लोन संस्थांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. टायटनचा स्टॉक 1 टक्क्यांहून अधिक घसरला. मुथूट फायनान्समध्ये सुमारे 4 टक्क्यांची घसरण झाली3.93 टक्क्यांनी घसरून तो 1951.95 रुपयांवर बंद झाला.
मन्नापुरम फायनान्स देखील 1.87 टक्क्यांनी घसरला आणि 197.58 रुपयांवर बंद झाला. गोल्ड लोनमुळे तुमच्या घरात ठेवलेल्या सोन्याचा चांगला उपयोग होतो आणि त्या बदल्यात तुम्हाला कमी व्याजावर कर्जही मिळते. देशात GOLD LOAN घेणारे लोक मोठ्या संख्येने आहेत आणि या विभागातील कर्ज घेणे आणि देणे हे मुख्यत्वे सोन्याच्या व्यवसायाशी संबंधित आहे.