BSNL sim Port online: आता तुम्ही तुमच्या सिम कार्ड ला घरी बसल्या ऑनलाईन port करू शकता प्रायव्हेट कंपनींद्वारे रिचार्ज प्लॅन महाग केल्यानंतर अनेक लोकांनी BSNL मध्ये पोर्ट केले. आणि पोर्ट कसे करायचे याची माहिती नसल्यामुळे काही लोकांनी पोर्ट केले नाही. लोक बीएसएनएल मध्ये पोर्ट करत आहेत तर तुम्ही सुद्धा सोप्या पद्धतीने बीएसएनएल मध्ये पोर्ट करू शकता ते कसे तर आजच्या लेखामध्ये पाहूया.
या महिन्याच्या सुरुवातीस प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांद्वारे रिचार्ज प्लॅन च्या किमतीमध्ये वाढ केलेली दिसून आली ज्यामुळे युजर्स हे स्वस्त प्लानसाठी बीएसएनएल कडे पाहत आहेत लगातार आपल्या ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्याचे काम बीएसएनएल कंपनी करत आहे यामुळे खूप वेगाने लोक बीएसएनएल कंपनीमध्ये आपले सिम पोर्ट करत आहेत जर तुम्ही सुद्धा तुमचा नंबर BSNL मध्ये port करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयोगी ठरेल.
आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बीएसएनएल मध्ये 28 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंतच्या validity चे प्लॅन उपलब्ध आहेत अन्य कंपन्यांच्या तुलनेमध्ये खूप स्वस्त आहेत यामुळे ग्राहकांच्या खिशावर पडणारा अतिरिक्त भार कमी होईल या कारणामुळे लोक BSNL कडे पाहत आहेत आणि BSNL कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणे वाढत आहे.
BSNL नेटवर्क बाबतीत पहायचे झाल्यास प्रायव्हेट कंपनी पेक्षा BSNL कंपनीचे नेटवर्क कमकुवत आहे परंतु त्यांच्या स्वस्त प्लॅन मुळे ही कंपनी सर्वांना टक्कर देत आहे आणि BSNL कंपनीने सध्या 4 G नेटवर्क लॉन्च केले आहे BSNL कंपनी ज्या किमतीवर रिचार्ज प्लॅन्स देत आहे अशा प्रकारचे कोणत्याही कंपनीचे प्लॅन्स उपलब्ध नाहीत. जर तुम्ही जिओ आणि एअरटेल युजर्स आहात तर तुमच्या सिम कार्ड ला बीएसएनएल कंपनीमध्ये पोर्ट करायचे असेल तर त्या Process ची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध आहे.
जिओ एअरटेल मधून बीएसएनएल मध्ये पोर्ट करण्याची प्रक्रिया.
जिओ आणि एअरटेल मधून बीएसएनएल मध्ये पोर्ट करण्यासाठी तुम्हाला 1900 वर एक एसएमएस पाठवून पोर्ट करण्याची रिक्वेस्ट करावी लागेल.
यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये मेसेज बॉक्स ओपन करावा लागेल आणि त्यामध्ये Port टाईप करून स्पेस द्या आणि तुमचा मोबाईल नंबर टाईप करून 1900 वर पाठवावे लागेल.
यानंतर तुम्हाला एसएमएस मध्ये एक खास युनिक पोर्टिंग कोड प्राप्त होईल जो 15 दिवसांसाठी valid असेल यानंतर या code ला तुमच्या जवळच्या BSNL सर्विस सेंटर च्या अधिकृत फ्रेंचाईसी Retailer कडे द्यावे लागेल.
यानंतर तुम्हाला पोर्टिंग कोड आणि आधार कार्ड इत्यादी माहिती सर्विस सेंटरला द्यावी लागेल यानंतर तुम्हाला BSNL चे नवीन सिम कार्ड दिले जाईल तुम्हाला पोर्टिंग पूर्ण करण्यासाठी काही पैसे द्यावे लागतील.
सिम PORTING मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला BSNL सिम ची पोर्टिंग तारीख आणि वेळ सांगितला जाईल यानंतर सांगितलेली तारीख आणि वेळेवर तुमचे BSNL सिम कार्ड ACTIVE होईल.
टेलिकॉम REGULATORY AUTHORITY ऑफ इंडिया च्या नवीन नियमांच्या आधारे नवीन टेलिकॉम ऑपरेटर मध्ये शिफ्ट होण्यासाठी WAITING पिरियड सात दिवसांचा झाला आहे सिम कार्ड ला पोर्ट होण्यासाठी सात दिवसांचा वेळ लागेल.