gold update today – लग्नाच्या मोसमामध्ये अनेक नातेवाईक ( relative ) भेटवस्तू म्हणून ( gold ) सोन्याचे दागिने देतात. नववधूंना भरपूर सोने मिळते. अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात हा प्रश्न येईल की सोने ठेवण्यास काही मर्यादा आहे का? Gold update today
सोन्यावरही काही कर आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे कर तज्ञ गौरी चढ्ढा यांनी CNBC Awaaz च्या Tax Guru या विशेष कार्यक्रमात दिली. सोने ठेवण्यासही मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही तुमच्याकडे किती सोने ठेवू शकता आणि सोने ठेवल्यानंतर टॅक्स किती लागतो. संपूर्ण माहीती जाणुन घ्या.
आपण आपल्याजवळ किती सोने ठेवू शकता?
कर तज्ज्ञ गौरी चढ्ढा यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी सीबीडीटीने एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकात असे लिहिले होते की, मुले 100 ग्रॅम सोने सोबत ठेवू शकतात. अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने सोबत ठेवू शकतात आणि विवाहित महिलांना 500 ग्रॅम सोने ठेवण्यास कोणतेही बंधन नाही.gold rate today
यापेक्षा जास्त सोने ठेवले तर काय होईल?
तुम्ही तुमच्या जवळ या मर्यादेपेक्षा अधिक सोने ठेवल्यास, तुमच्या कडे हे सोने कसे आले याचा पुरावा तुम्हाला इनकम टॅक्स विभागाला द्यावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमचे उत्पन्न 10 लाख रुपये दाखवले असेल आणि त्यातून तुम्ही 2 लाख रुपयांचे सोने खरेदी केले असेल आणि तुमची बिलेही असतील, तर तुमच्यासाठी कोणतीही अडचण नाही.gold update
पन जर तुमची वर्षाची कमाई 2 लाख रुपये आहे आणि तुमच्याकडे 50 लाख रुपयांचे सोने आहे तर तुम्ही ते कोठून आले हे स्पष्ट करू शकणार नाही आणि तुम्हाला येणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागेल. Gold
उत्पन्नाच्या अनेक पट सोने ठेवल्यास व्याजासह कर आणि दंड लागू होईल. त्यामुळे उत्पन्न आणि सोने खरेदी यामध्ये समन्वय राखणे अत्यंत आवश्यक आहे.gold update
लग्नात मिळणाऱ्या सोन्यावर काय कर लागणार?
लग्नाबाबत बोलायचे म्हटल्यावर गौरी चढ्ढा यांनी सांगितले की, लग्नामध्ये मिळालेल्या सोन्यावर कसलाही टॅक्स भरावा लागत नाही. पण तुम्हाला लग्नाची भेट म्हणून मिळालेल्या सोन्याचा पुरावा तुमच्याकडे ठेवावा लागेल जेणेकरून भविष्यात काही अडचण आल्यास ते तुम्हाला लग्नाची भेट म्हणून मिळाल्याचे सिद्ध करता येईल.gold update today
इनहेरिटेड टॅक्स फ्री म्हणजे काय?
जर तुमच्या जवळ वारसाहक्काने सोने आले असेल तर त्यावर कसलाही टॅक्स नाही. सोन्याचा वारसा हा एक पुरावा आहे. वारसाहक्काने मिळालेल्या सोन्यासाठी तुम्ही इच्छापत्र तयार करावे जेणेकरून उद्या तुमच्या मुलांना कोणतीही अडचण येऊ नये.
Written by sangita lokhande, 3 September 2024