PM home loan subsidy Yojana .
नमस्कार मित्रांनो ,शहरी भागात आणि तसेच ग्रामीण भागात आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या लोकांना घर बांधण्यासाठी केंद्र सरकारने कमी व्याजदर वर लोन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार द्वारे pm home loan subsidy Yojana ची सुरुवात केली जाणार आहे .
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना होम Loan वर 3% टक्के ते 6% टक्के पर्यंत व्याजाची सबसिडी दिली जाईल प्रधानमंत्री होम लोन सबसिडी योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी हा लेख पूर्णपणे लक्षपूर्वक वाचा.
List of contents
- पी एम होम लोन सबसिडी योजना.
- होम लोन सबसिडी योजनेसाठी पात्रता.
- शहरी क्षेत्रांसाठी योजनेची पात्रता आणि अटी.
Pm home loan subsidy Yojana online apply.
पीएम होम लोन सबसिडी योजना .
सरकारद्वारे देशांमध्ये बेघर तसेच झोपडपट्ट्यांमध्ये राहत असणाऱ्या लोकांसाठी पीएम होम सबसिडी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या योजनेमध्ये घर बनवण्यासाठी लागणाऱ्या लोन साठी व्याजावर सरकारकडून सबसिडी दिली जाईल सामान्यतः होम लोन वर 10% टक्के ते 18% व्याजदर लावला जातो परंतु पीएम होम लोन योजनेमध्ये होम लोन वर लागणाऱ्या व्याजावर 3% टक्के ते 6% टक्के पर्यंत सबसिडी दिली जाईल अर्थातच व्याजदर हे कमी करण्यात येईल.
होम लोन सबसिडी योजनेसाठी पात्रता.
प्रधानमंत्री होम लोन सबसिडी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता तसेच काही अटी आहेत . पीएम होम लोन सबसिडी योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये होम लोन सबसिडी प्राप्त करण्यासाठी खालील पात्रता व अटी पूर्ण असणे आवश्यक असेल.
PM home loan subsidy Yojana.
- अर्ज करणारे व्यक्ती आर्थिक स्थिती BPL म्हणजेच दारिद्र्य रेषेखाली समान किंवा यापेक्षा कमी असली पाहिजे.
- दारिद्र रेषेच्या वरील व्यक्तीसाठी या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार व्यक्तीकडे घर बनवण्यासाठी जागा असणे गरजेचे आहे.
- जर अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य आधीपासूनच भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या आवास योजनेचा लाभ घेत असेल तर त्या व्यक्तीला होम लोन सबसिडी योजनेचा फायदा मिळणार नाही.
- या योजनेमध्ये अर्जदाराच्या कुटुंबातील स्वतः अर्जदार त्याची पत्नी आणि त्यांच्या मुलांचा समावेश होतो.
- जर अर्जदाराच्या मुलांचे दुसरे राशन कार्ड बनवले गेले असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत कुटुंब यादीतून वेगळे मानले जाईल.
शहरी भागासाठी योजनेची पात्रता व अटी.
कमी उत्पन्न समूह ( LIG): या श्रेणीमध्ये असे परिवार आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत आहे.
मध्यम उत्पन्न समूह
(MIG)1: वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 12 लाख रुपये.मध्यम उत्पन्न समूह
2:(MIG2): वार्षिक उत्पन्न 12 लाख ते 18 लाख च्या मध्ये असावे.
आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग (EWS): या योजनेअंतर्गत या श्रेणीमध्ये आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील लोकांचा समावेश आहे यामध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त तीन लाख रुपये आहे.
या व्यतिरिक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सामान्य अटी सुद्धा आहेत ज्या शहरी आणि ग्रामीण दोन्ही क्षेत्रांमध्ये समान रूपात लागू होतात.
PM home loan subsidy Yojana
चा लाभ हा फक्त त्या क्षेत्रामध्ये दिला जाईल जेथे ही योजना सुरू केली गेली आहे .
या योजनेमध्ये जर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आधीपासूनच पक्के घर बनवले असले तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र मानले जाईल.
प्रधानमंत्री होम लोन सबसिडी योजनेच्या पात्रता आणि अटी
पीएम आवास योजनेच्या समान आहेत परंतु एखाद्या व्यक्तीने पीएम आवास योजनेचा लाभ घेतला असेल तर pm home loan subsidy Yojana चा लाभ त्यांना दिला जाणार नाही.
PM home loan subsidy Yojana online apply.
प्रधानमंत्री होम लोन योजना लागू केली गेलेली नाही. यासाठी मंत्रालयाचे आदेश येताच या योजनेला सुरू केले जाईल. याची संभावना आहे . या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया offline आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून सुरू करण्याची संभावना आहे.
Written by: Anuj jadhav, Date :29/09/2024