Close Visit Mhshetkari

इतक्या महिन्यांत पैसे दुप्पट, सरकार घेते हमी… पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना Post office new Scheme.

Post office new Scheme :

बऱ्याच वेळा प्रत्येक जण सुरक्षित योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात. कारण यामुळे त्यांना दीर्घकाळासाठी जास्त प्रमाणात पैसे मिळू शकतील आणि व्याजदर किंवा इन्कम टॅक्स चा सुद्धा जास्त प्रमाणात फायदा  मिळतो.आज आम्ही तुम्हाला एका अशा योजनेबद्दल सांगत आहोत, ज्यावर व्याजाचा लाभही मिळेल आणि तुमची गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होईल. ही योजना पोस्ट ऑफिसशी जोडलेली आहे. या पोस्ट ऑफिसच्या योजनेतून तुम्हाला हमी उत्पन्न मिळते शिवाय, ही योजना सरकार चालवत असल्याने जोखीमही नगण्य आहे.

किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिस ची योजना आहे आहे. सध्या या योजनेअंतर्गत  वार्षिक ७.५ टक्के दराने व्याज दिले जात आहे.  किसान विकास पत्र ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एकरकमी गुंतवणूक योजना आहे, ज्या अंतर्गत व्याज त्रैमासिक आधारावर सुधारित केले जाते. या योजनेमध्ये तुम्ही काही निश्चित कालावधी मध्ये तुम्ही तुमचे पैसे डबल करू शकता या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये खाते काढावे लागेल.

115 महिने पैसे दुप्पट होतील .

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेअंतर्गत (KVP) किमान गुंतवणूक रु 1000 असू शकते. , जर तुम्हाला जास्त प्रमाणात गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही या योजनेमध्ये गुंतवू शकता. ही योजना वार्षिक ७.५ टक्के दराने परतावा देते. मागील वर्षामध्ये त्याचे व्याजदर 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के इतके करण्यात आले होते. पूर्वी या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी 120 महिने लागायचे, पण आता115 महिन्यांत म्हणजे 9 वर्षे आणि सात महिन्यांत पैसे दुप्पट होतील.

6 लाख 12 लाख रुपये होतील 

जर तुम्ही या योजनेत 6 लाख रुपये गुंतवले, तर वार्षिक 7.5 टक्के दराने, 6 लाख रुपयांचे पैसे 12 लाख रुपये होतील. गणने नुसार, पैसे दुप्पट होण्यासाठी 115 महिने प्रतीक्षा करावी लागेल.

म्हणजेच  9 वर्षे आणि 7 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट होतील. जर तुम्ही एकाच वेळी 7 लाख रुपये गुंतवले तर ही रक्कम या कालावधीत 14 लाख रुपये होईल. 

तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता का?

  जर तुम्हाला या योजनेअंतर्गत खाते उघडायचे असेल तर किसान विकास पत्र खाते सिंगल आणि संयुक्त उघडता येईल. पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत तीन लोक संयुक्त खाते उघडू शकतात. तथापि, या योजनेअंतर्गत नॉमिनी जोडणे अनिवार्य आहे. तुम्ही इच्छित असल्यास, तुम्ही हे खाते 2 वर्षे किंवा 6 महिन्यांनंतर बंद करू शकता.

 

Leave a Comment