Close Visit Mhshetkari

RBI ने UPI Lite limit आणि UPI 123PAY द्वारे व्यवहारांची मर्यादा बदलली, जाणून घ्या नवीन मर्यादा काय आहे ?

UPI lite Limit 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवार पासून UPI 123PAY आणि UPI Lite वॉलेटद्वारे व्यवहारांची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबी आयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी या घोषणेची माहिती दिली. UPI 123PAY ही एक झटपट पेमेंट प्रणाली आहे जी फीचर फोन वापरकर्त्यांसाठी डिझाइन केलेली आहे.

नवीन नियमांनुसार, UPI 123PAY मध्ये प्रति व्यवहार मर्यादा ₹ 5,000 वरून ₹ 10,000 करण्यात आली आहे. यासह, UPI Lite वॉलेट मर्यादा ₹2,000 वरून ₹5,000 करण्यात आली आहे आणि प्रति व्यवहार मर्यादा ₹500 वरून ₹1,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी असेही सांगितले की सध्या UPI आणि इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (IMPS) वापरून निधी पाठवणाऱ्याला पेमेंट व्यवहार करण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे (लाभार्थी) नाव सत्यापित करण्याची सुविधा प्रदान केली जाते. आता ही सुविधा रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम (RTGS) आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) प्रणालीमध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे.

ते म्हणाले, “या सुविधेमुळे पैसे पाठवणाऱ्या ला RTGS किंवा NEFT द्वारे निधी हस्तांतरित करण्यापूर्वी खातेधारकाच्या नावाची पडताळणी करता येईल. “यामुळे चुकीचे क्रेडिट आणि फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल.”

UPI Lite म्हणजे काय?

UPI Lite हे एक वैशिष्ट्य आहे जे वापरकर्त्यांना UPI पिन न टाकता ₹500 पर्यंतचे UPI व्यवहार करू देते. भविष्यात, ही मर्यादा ₹1,000 पर्यंत वाढवली जाईल, ज्यामुळे पेमेंट आणखी सोपे आणि अखंडित होईल. UPI Lite चे फायदे मिळवण्यासाठी, वापरकर्त्यांनी प्रथम त्यांच्या UPI Lite वॉलेट मध्ये निधी जमा करणे आवश्यक आहे. यापूर्वी, वॉलेट मध्ये जोडता येणारी कमाल रक्कम ₹2,000 होती.

 

Leave a Comment